Breaking News

पनवेलमध्ये महिनाभर स्वच्छता मोहीम; कोळीवाड्यापासून शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त

नारळी पौर्णिमा तसेच गणेशोस्तव हा सण येत्या काही दिवसांमध्ये साजरा होणार आहे. या सणांच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19मध्ये आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिनाभर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी या मोहिमेचा प्ररंभ पनवेल कोळीवाडा येथून झाला.

स्वच्छता मोहिमेअंतर्गत प्रभागातील 112 रस्त्यांची तसेच या रस्त्यांवर असलेल्या दुतर्फा गटारांची सफाई साफसफाई करण्यात येणार आहे. या मोहमेला शुक्रवारपासून पनवेल कोळीवाडा पासून सुरुवात झाली. या वेळी नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, युवा मोर्चाचे चिन्मय समेळ, आरोग्य अधिक्षक शैलेश गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

या मोहीमेसंदर्भात नगरसेविका रुचिता लोंढे यांनी अधिक माहिती देत गणेशोत्सव सुरू होण्याआगोदर ही स्वच्छता मोहीम पुर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply