Breaking News

तासगाव आदिवासीवाडीतील विद्यार्थ्यांना पुस्तक संच भेट

माणगाव : प्रतिनिधी

अविष्कार फाऊंडेशनच्या रायगड शाखेच्या वतीने माणगाव तालुक्यातील तासगाव आदिवासीवाडीमधील विद्यार्थ्यांना पुस्तक संच भेट देण्यात आले.

कोरोना काळात रोजगार गमावलेल्या आदिवासी बांधवांच्या पाल्यांना सहाय्यभूत व्हावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

फाऊंडेशनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदिप नागे, कार्याध्यक्ष शंकर शिंदे यांच्या प्रयत्नातून सदर पुस्तक संच वाटप करण्यात आले. या वेळी फाऊंडेशनचे माणगाव तालुका अध्यक्ष दिनेश महाडिक, मारुती फाऊंडेशनचे अजित शेडगे, तासगाव आदिवासीवाडीवरील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

वाटप करण्यात आलेले पुस्तक संच कै. कुमारी कल्याणी शांताराम खाडे यांच्या स्मरणार्थ गोरक्ष मंदिर अध्यक्ष शांताराम बाळू खाडे यांनी व रायगडचे शिलेदार या ग्रुपच्या वतीने भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांना पुस्तके प्राप्त झाल्याबद्दल मुख्याध्यापक दिनेश महाडिक यांनी फाऊंडेशनचे आभार मानले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply