Breaking News

शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन!

पनवेल ः प्रतिनिधी
उरण तालुक्यातील जासई येथे शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांकरिता जानेवारी 1984 साली प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आंदोलन उभे केले होते. गुरुवारी (दि. 16) या लढ्याला 36 वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी याच दिवशी या लढ्यात हुतात्मा झालेल्या शेतकर्‍यांना अभिवादन करण्यात येते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास सर्वपक्षीय नेते आणि मान्यवर उपस्थित होते.
शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कांकरिता जानेवारी 1984 साली प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यातील जासई येथे प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आंदोलन उभारले होते. या गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्यात 16 जानेवारी 1984 रोजी चिर्ले येेथील नामदेव शंकर घरत, धुतूम येथील रघुनाथ अर्जुन ठाकूर हे हुतात्मे झाले. या गौरवशाली आणि शौर्यशाली लढ्याचा 36वा स्मृतिदिन गुरुवारी महात्मा फुले सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने जासई येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून गजानन म्हात्रे यांनी प्रकाशित केलेल्या ‘लढा साडेबाराचा’ या पुस्तकाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, तसेच उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या वेळी भाजपचे उत्तर रायगड अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, माजी आमदार मनोहर भोईर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, कामगार नेते महेंद्र घरत, जितेंद्र घरत, सुरेश पाटील, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, चंद्रकांत घरत, अतुल पाटील, जे. डी. तांडेल, भूषण पाटील, दिनेश पाटील यांसह मान्यवर उपस्थित होते. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply