नागोठणे, पाली : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील शिहू बेणसे येथील घनदाट जंगलात एका महिलेला अनैतिक संबंधातून ठार मारून पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. 3) घडली. या निर्घृण हत्येने एकच खळबळ उडाली. दरम्यान, नागोठणे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिला ही आरोपी विजय लक्ष्मण शिद (वय 22, रा. उनाटवाडी, भिसेखिंड) याची आत्या होती. या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. या संबंधातून मयत महिला आरोपीकडे पैशाची मागणी करायची. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने तिला नागोठण्याजवळील शिहू बेणसे परिसरातील करकरणी देवी मंदिर परिसरातील डोंगराळ भागात भेटायला बोलवून तिची हत्या केली व मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आग व धूर पाहिल्यानंतर तेथील दोन सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी गेले व त्यांनी आरोपीच्या मोटरसायकलचा फोटो मोबाईलमध्ये टिपला आणि त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तपासचक्र फिरवून आरोपीला अटक केली.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper