पोलादपूर : प्रतिनिधी
तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांची सातारा येथे बदली झाली आहे. पोलादपूर तालुका कृषी कार्यालयामधील कर्मचार्यांनी त्यांना नुकताच निरोप दिला, त्या वेळी धुमाळ यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
कैलास धुमाळ हे गेल्या तीन वर्षांपासून पोलादपूर तालुका कृषी अधिकारी म्हणून कार्यरत होते. महाड उपविभागीय कृषी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारदेखील त्यांनी सक्षमपणे सांभाळला होता. त्यांची सातारा जिल्हा परिषदेमध्ये मोहीम अधिकारीपदी बदली झाली आहे. पोलादपूर तालुका कृषी कार्यालयामधील कर्मचार्यांनी कैलास धुमाळ यांना नुकताच निरोप दिला. या वेळी तालुका कृषी कार्यालयातर्फे त्यांना भेटवस्तू देण्यात आली, तर उपस्थित कर्मचार्यांनी चरणस्पर्श करून त्यांच्यावर फुलांची उधळण केली.