Breaking News

खालापूर नगरपंचायत निवडणुकीची प्रतीक्षा

नऊ महिने लोकप्रतिनिधींशिवाय कारभार

खोपोली : प्रतिनिधी

कोरोनामुळे मुदत संपल्यानंतरदेखील निवडणूक होऊ न शकल्याने खालापूर नगरपंचायतीचा कारभार गेल्या नऊ महिन्यांपासून लोकप्रतिनिधींशिवाय सुरू आहे.

खालापूर नगरपंचायतीचा पाच वर्षाचा कालावधी जानेवारी 2021 मध्ये पूर्ण झाला. तत्पूर्वी नोव्हेंबर 2020मध्ये नगरपंचायतीच्या 17 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक होण्याची चिन्हे होती. राजकीय पक्ष आणि इच्छुकांच्या हालचालींना वेगही आला होता, मात्र कोरोना दुसर्‍या लाटेत निवडणुकीचा ज्वर उतरला आणि मुदत संपल्यानंतर नगरपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे आला. कर्जतचे प्रांताधिकारी गेल्या नऊ महिन्यांपासून खालापूर नगरपंचायतीचा कारभार पाहत आहेत.

खालापूर नगरपंचायतीची व्याप्ती लहान असली, तरी जनतेने निवडून दिलेले हक्काचे लोकप्रतिनिधी नसल्याने, सर्वसामान्य नागरिकांना लहानसहान समस्येसाठी प्रशासनाकडे धाव घ्यावी लागत आहे. खालापूर नगरपंचायत हद्दीत आठ आदिवासी वाड्या आहेत. याशिवाय महडसारखे तीर्थक्षेत्र आणि तालुक्याचे ठिकाण असलेल्या खालापूर शहराचा समावेश आहे. त्याचा दैनंदिन ताळमेळ साधताना प्रशासनात उणिवा राहत आहेत.

खालापूर शहराची मुख्य समस्या पिण्याचे पाणी अधूनमधून डोके वर काढत असते. याशिवाय दिवाबत्ती, स्वच्छता या दैनंदिन समस्येसाठी ऊठसूट नगरपंचायत कार्यालय गाठण्यापेक्षा प्रभागातील नगरसेवक हक्काचा असतो.

लोकप्रतिनिधी नसल्याने अनेक कामे खोळंबतात. अपंग कल्याण निधीचे वाटप यासारखी समस्या घेऊन अनेक जण येतात. पाठपुरावा करण्यासाठी प्रशासनापेक्षा लोकप्रतिनिधी सोयीचा वाटतो. दोन वर्षे अपंग कल्याण निधी न मिळाल्याने अपंगांचे हाल होत आहे.

-राहुल चव्हाण, माजी नगरसेवक, नगरपंचायत खालापूर

पावसाळ्यात शहरात टीसीएल टाकण्यासाठी प्रशासनाला वारंवार सांगूनसुद्धा काम होत नाही. लोकप्रतिनिधी नसल्यास प्रशासनावर वचक राहत नाही, प्रशासन मनमानीपणे वागते.

-राकेश गव्हाणकर, अध्यक्ष, खालापूर शहर भाजप

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply