Breaking News

विरोधक अफवा पसरवित आहेत -वैकुंठ पाटील

पेण : प्रतिनिधी

रायगड लोकसभा मतदार संघात विरोधी पक्षाला पराभव समोर दिसू लागल्यामुळेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 23) रावे (ता. पेण) गावातील मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव आखला होता. तो डाव हाणून पाडण्याचे काम आम्ही केले. यावेळी आम्ही सयंम बाळगल्यामुळेच कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, मात्र विरोधी पक्ष फक्त अफवा पसरविण्याचे काम करीत असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 पेण तालुक्यातील रावे मतदान केंद्र हे पहिल्यापासून संवेदनशील केंद्र म्हणून घोषीत करण्यात आले असून, याठिकाणी अनुचित घटना घडावी व हा मतदार संघ अतिसंवेदनशील व्हावा, असा डाव विरोधी पक्षाचा होता. मी मतदान करुन गावातील घराकडे निघालो असता, काही विरोधी पक्षाच्या मंडळींनी हेतूपुरस्सर  वादविवाद काढून याठिकाणी वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही सयंमाची भूमिका घेतल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही, असे पत्रकार परिषदेत वैकुंठ पाटील यांनी सांगितले. रावे गाव हा पहिल्यापासून आमचा बालेकिल्ला असून यापुढेही राहणार आहे. गावातील जनता ही आमच्या पाठिशी नेहमीच राहिली असून, प्रत्येकाचे नातेगोते असल्यामुळे ग्रामस्थ आपलेच आहेत हीच भूमिका आपली राहिली आहे. यामुळे क्षणभर आनंद व नैराश्यापोटी ज्यांनी अफवा पसरविण्याचे काम केले आहे, त्यांना येथील मतदार त्यांची जागा निश्चित दाखवतील. रावे गावात उत्स्फुर्तपणे मतदान झाले असून मतदानाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीच तक्रार दाखल करण्यात आल्याचे यावेळी वैकुंठ पाटील यांनी सांगितले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply