Breaking News

सर्वाधिक मतदान पेण, अलिबागमध्ये

पेण : प्रतिनिधी

पेण मध्ये 3 लाख 76 इतके मतदार असून 65.17 टक्के म्हणजे 1 लाख 95 हजार 567 मतदान झाले तर अलिबागमध्ये 2 लाख 92 हजार 421 मतदार असून पैकी 1 लाख 89 हजार 758 म्हणजे 64. 89 टक्के मतदान झाले.यापाठोपाठ दापोली येथे 2 लाख 79 हजार 238 मतदार असून 1 लाख 71 हजार 907 इतके म्हणजे 61.56 टक्के मतदान झाले. तर श्रीवर्धन येथे 2 लाख 56 हजार 180 मतदारांपैकी 1 लाख 52 हजार 664 म्हणजे 59.59 टक्के मतदान झाले आहे. गुहागर येथे 2 लाख 39 हजार 415 मतदार आहेत त्यापैकी 1 लाख 41 हजार 709 म्हणजे 59.19 टक्के तर महाड येथे  2 लाख 84 हजार 230 मतदारांपैकी 1 लाख 68 हजार 580 म्हणजे 59.31 टक्के असे मतदान झाले. रायगड मतदारसंघात 8 लाख 9 हजार 343 पुरुष मतदार आहेत त्यापैकी 5 लाख 4 हजार 998 जणांनी मतदान केले   तर 8 लाख 42 हजार 214 महिला मतदारांपैकी 5 लाख 15 हजार 187  महिलांनी मतदान केले.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply