Breaking News

मिनीट्रेनला खासगीकरणाचा धोका

मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्ड कडून नेरळ- माथेरान-नेरळ मिनीट्रेन या जागतिक वारसा मिळावा म्हणून 2012 पासून युनोस्कोचा वारसा मिळविण्याच्या तयारीत असलेल्या मिनीट्रेनला जागतिक वारसा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मात्र मिनीट्रेनची ओळख असलेल्या नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन ची प्रवासी वाहतूक सुरूच नाही. दुसरीकडे जागतिक वारसा बनण्याच्या तयारीत असलेल्या मिनीट्रेनची इंजिने आज प्रवासी वाहतुकीसाठी सक्षम आहेत काय? हा देखील मोठा प्रश्न आहे. 

1907 मध्ये सर आदमजी पीरभॉय यांच्या आर्थिक तरतुदींमधून आणि नेरळ- माथेरान- नेरळ मिनीट्रेन हा 21 किलोमीटरचा मार्ग शोधून काढून साकारला.दोन वर्षे खडतर प्रयत्न केल्यानंतर मिनीट्रेन मार्गावर आली आणि हि माथेरान राणी म्हणून संबोधली जाऊ लागली. मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असलेली हि माथेरान राणीला जागतिक वारसा मिळावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. मात्र आज नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनची स्थिती काय आहे?याचा अभ्यास हेरिटेज नियमावली साठी प्रयत्न करणार्‍या मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डाला याबाबत माहिती आहे किंवा नाही?हा प्रश्न आहे. मिनीट्रेनचा 21 किलोमीटरचा ट्रक सह मिनीट्रेन साठी वापरली जाणारी वाफेवरील तसेच डिझेल इंजिने, त्याचवेळी एअर ब्रेक प्रणालीवर चालणारी इंजिने यांचा समावेश जागतिक वारसा मध्ये व्हावा यासाठी मध्य रेल्वेचा पर्यटन सुरु आहे. त्यानंतर मिनीट्रेनची स्थानके हि देखील हेरिटेज नामावली मिळविण्यासाठी प्रयत्नशील होती.मिनीट्रेनच्या मार्गावरील 200 हुन अधिक वेडीवाकडी वळणे आणि कमी रुंदीचा नॅरोगेज मार्ग यामुळे जागतिक वारसा मिळविण्यात हि ट्रेन यशस्वी होईल असे वाटले होते. पण मध्य काळात अनेक वेळा पावसाळ्यानंतर नेरळ- माथेरान- नेरळ मिनीट्रेनची वाहतूक बंद पडत असते. पावसाळ्यात भुस्खनन होऊन नॅरोगेज मार्ग वाहून जाण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने मिनीट्रेनला हेरिटेज मानांकन अद्याप मिळाले नाही.नॅरोगेज वर चालणार्‍या नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन चे जगातील दर्दी रसिकांना असलेले आकर्षण यामुळे हि मिनीट्रेन देखील दार्जिलंग आणि कालका-सिमला प्रमाणे जागतिक वारसा मिळवू शकते. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनाना बंदी असलेले माथेरानचे आकर्षण लक्षात घेऊन आणि कोरोना महामारीनंतर माथेरान हे पर्यटन स्थळ पर्यटकांनी ओसंडून वाहत आहे.त्याचवेळी नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेन मार्गावरील अमन लॉज-माथेरान या दरम्यान चालवल्या जाणार्‍या शटल सेवेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मिनीट्रेनचे ब्रॅण्डिंग करायला घेतले आहे.

मात्र मध्य रेल्वे ज्या हेरिटेज नामांकन मिळविण्यासाठी धडपड करीत आहे त्या नेरळ-माथेरान-नेरळ मिनीट्रेनचे आकर्षण असलेला नेरळ माथेरान प्रवास प्रवाशाना करता येत नाही. दुसरीकडे मिनीट्रेनला लावली जाणारी वाफेवरील इंजिने अनेक वर्षे बंद अवस्थेत नेरळ लोको मध्ये पडून आहेत. मिनीट्रेनचे विशेष असलेली माथेरान राणी चालविली जात असल्याने मध्य रेल्वेची हेरिटेज नामांकन मिळविण्यासाठी सुरु असलेली धडपड कशासाठी? हा प्रश्न आहे. नेरळ-माथेरान-नेरळ असा प्रवास सुरु नाही आणि त्यामुले या ट्रेन बद्दल रेल्वे च्या आयआरसीटीसी या वेब साईट वर देखील मिनी ट्रेन बद्दल कोणतेही स्टेटस नाही आणि त्यामुळे परदेशी पर्यटक हे मिनीट्रेन बंद असल्याने या ठिकाणी वळत नाहीत हि वस्तुस्थिती असताना देखील मध्य रेल्वेची हि धावपळ कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पूर्वी मिनीट्रेन आणि मिनीट्रेन चे वाफेवरील इंजिन यांचा अभ्यास करण्यासाठी मिनीट्रेनचे परदेशी अभ्यासक हे नेरळ- माथेरान मार्गावर खास गाडी बुक करून येत असत. फक्त त्याच्यासाठी नेरळ- जुम्मापट्टी या दरम्यान मिनीट्रेनची विशेष फेरी आयोजित केली जायची. मात्र गेली काही महिने नेरळ येथून गाडीचं चालविली जात नाही आणि त्यात या गाडीचे ऑनलाईन बुकिंग करता येत नसल्याने मिनीट्रेन परदेशी पर्यटक येणेच गेली पाच वर्षात बंद झाले आहे. असे असताना मिनीट्रेन हेरिटेज होईलच कशी हा प्रश्न असून मिनीट्रेन बाबत आधी मध्य रेल्वेने प्रशासनाने थेट वाहतूक सुरु केली पाहिजे आणि नंतरच हेरिटेज नेमकं मिळविण्यासाठी धावपळ करायला हवी ?

रेल्वेच्या अधिकारी वर्गाला जर माथेरान मिनिट्रेन सुरु ठेवण्याबाबत  स्वारस्य नाही. त्यात  मिनिट्रेन भाविषयात  टाटा, रिलायन्स अथवा अन्य उद्योग समूहाशी करार करून खासगी पद्धतीने देण्यात येईल अशी चर्चा सुरु आहे. मिनीट्रेनचे खासगीकरण झाल्यास रेल्वे कडून चांगल्या सेवा पर्यटकांना उत्तम प्रकारे सेवा उपलब्ध होऊन इथल्या पर्यटनात वाढ होऊन सर्वानाच चांगल्या प्रकारे रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकते असा काहींनाच दावा आहे. माथेरानकरांचे अर्थातच येथील लहानमोठ्या स्टॉल धारकांपासून, दुकानदार, रेस्टॉरंट चालक, सर्वसामान्य मोलमजुरी करणार्या श्रमिक वर्गासह उचचभ्रू हॉटेल इंडस्ट्री या सर्वांनाच पर्यटनावर अवलंबून राहावे लागते परंतु बहुतांश पर्यटक हे माथेरान मिनिट्रेनच्या प्रवासासाठी येत असतात. अनेक वर्षे नेरळ माथेरान दरम्यान धावणारी मिनिट्रेन सेवा बंद करण्यात आल्यामुळे पर्यटकांना नाईलाजाने खाजगी मोटार वाहनाने अथवा स्वतःच्या मोटारीने यावे लागते.दस्तुरी नाक्याजवळील अमन लॉज रेल्वे स्टेशन पासून गावात जाण्यासाठी शटल सेवा उपलब्ध आहे परंतु त्यात सुध्दा आता तीन बोगी द्वितीय श्रेणी साठी असल्याने केवळ नव्वद प्रवाशांना लाभ घेता येतो तर एक बोगी प्रथम श्रेणी असल्याने त्यात जेमतेम दहा ते पंधरा प्रवासी प्रवास करू शकतात त्यामुळे अनेकांना या शटल सेवेचे तिकीट सुध्दा उपलब्ध होत नाही. सुट्ट्यांच्या हंगामात मोठया प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असून शटलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळत असताना या मार्गावर बोग्यांची संख्या वाढवली जात नाही.

आज अशी स्थिती कर्मचारी वर्गाचा पगार सुध्दा कमी बोग्यांच्या संख्येमुळे प्राप्त होत नाही. तरी देखील रेल्वेच्या वरिष्ठांना याबाबत काहीएक सोयरसुतक दिसून येत नाही.त्यामुळे नेरळ माथेरान आणि अमन लॉज ते माथेरान दरम्यान जी शटल सेवा उपलब्ध आहे या गाड्यांचे खाजगीकरण केल्याशिवाय पर्याय नाही असे स्थानिकांसह पर्यटकांमधून बोलले जात आहे. 2005 मध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वेच्या मार्गावरील अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या त्यानंतर रेल्वे मार्गाची दुरुस्ती केल्यानंतर मधल्या काळात ही सेवा सुरळीत सुरू होती त्यानंतर आजपर्यंत ही सेवा बंद करण्यात आली आहे त्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली असून याचा इथल्या पर्यटनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे.नुकताच रेल्वेचे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी इथे धावती भेट दिली त्यावेळी त्यांनी फक्त रेल्वे स्टेशनमध्ये दुरुस्ती त्याचप्रमाणे अन्य सोयीसुविधा करणेबाबत स्थानिकांशी चर्चा केली होती. नेरळ माथेरान या सेवेबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. आजपर्यंत करोडो रुपये या मार्गावर खर्च करण्यात आलेला आहे परंतु नेरळ माथेरान सेवा सुरू करण्याबाबत यांची मानसिकता दिसून येत नाही.

1907 साली सर आदमजी पिरभोय आणि अब्दुल हुसेन आदमजी पिरभोय या पितापुत्रांनी केवळ चार वर्षात अवघड वळणांच्या या कठीण मार्गावर स्वखर्चाने त्याकाळी सोळा लाख रुपये खर्च करून रेल्वे सुरू केली होती आणि आताचे अधिकारी वर्ग हे सर्व प्रकारच्या अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असताना हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहेत ही लाजिरवाणी बाब असल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षांपासून या गावाशी एकप्रकारची नाळ जुळली गेली आहे. मिनिट्रेनचा प्रवास हाच इथे येण्याचा आमच्या कुटुंबातील सदस्यांचा एकमेव उद्देश असतो परंतु काही वर्षांपासून नेरळ माथेरान मिनिट्रेन बंद करण्यात आली आहे त्यामुळे आम्हाला नाईलाजाने खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत लवकरच सुवर्णमध्य काढून ही सेवा पूर्वपदावर आणावी अशी अपेक्षा आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply