Breaking News

नगरसेविका दर्शना भोईर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पनवेल ः राम्रपहर वृत्त

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्या, रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्या तथा नगरसेविका दर्शना भोईर यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 19) विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील रोझ बाजरमध्ये फुफ्फुसांची क्षमता तपासणी शिबिराचे अयाोजन करण्यात आले होते. या शिबिराचे महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले.  या वेळी उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नितीन पाटील, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा वर्षा नाईक, सुहासिनी केकाणे, कामगार नेते रवी नाईक, सपना पाटील, कविता पाटील, अरुणा पाटील, इंदुताई कोल्हे, सुमती काठे, मंदा राऊत, साहेबराव घुमरे, अत्माराम लवाटे, कांता लवाटे, रंजना जितेकर, अंजली इनामदार, अक्षया चितळे, संतोष ढगे, राजू कोळी, राकेश जाधव, अनंत गुरज, प्रसाद म्हात्रे, सुमन काझी, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि. 22) योजना आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये काही निवडक योजनांची माहिती नागरिकांना देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कार्यक्रमही घेण्यात येणार आहे. या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका दर्शना भोईर यांनी केले आहे.

Check Also

आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा ग्रामपंचायतीच्या उद्धव ठाकरे गटाच्या सरपंच …

Leave a Reply