Breaking News

रायगडात हमीभाव भात खरेदी केंद्र उघडणार

जिल्हाधिकार्‍यांचा अद्यादेश; भाजप किसान मोर्चाच्या मागणीला यश

कर्जत : बातमीदार

रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यात विविध 40 ठिकाणी भाताची हमी भावाने खरेदी केली जाणार असून 30 नोव्हेंबरपर्यंत भाताची ऑनलाइन नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे भाजप किसान मोर्चाच्या मागणीला यश आले आहे.

शासनाच्या नियमाप्रमाणे एक ऑक्टोबर रोजी भाताची हमी भावाने खरेदी करण्याचे आदेश आहेत. मात्र रायगड जिल्हा फेडरेशनने हमीभाव भात खरेदी केंद्र सुरु केली नव्हती. त्यामुळे हमीभाव भात खरेदी केंद्र तातडीने सुरु करावीत, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप किसान मोर्चाने दिला होता. मोर्चाचे कोकण प्रदेश संघटक सुनील गोगटे यांनी या मागणीची निवेदने कर्जत, खालापूर तहसीलदारांना दिली होती.

भाताची हमी भाव केंद्रावर विक्री करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन  नोंदणी करणार्‍या शेतकर्‍यांचा भात खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जिल्ह्यातील 80 टक्के शेतकर्‍यांच्या शेतीचे कामे सुरु असल्याने भाताची विक्री करण्यासाठी त्यांनी नोंदणी केली नव्हती. त्यामुळे ऑनलाइन नोंदणीचा आदेश रद्द करावा, अशीही मागणी करण्यात आली होती.

 दरम्यान, रायगड जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी हमीभावाने भात खरेदी करण्यासाठी जिल्ह्यातील 40 ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचा अद्यादेश काढला आहे. रायगड जिल्ह्यात अलिबाग व पेण तालुक्यात प्रत्येकी सहा, कर्जत तालुक्यात पाच, रोहा तालुक्यात चार, पोलादपूर तालुक्यात दोन आणि म्हसळा, पनवेल, खालापूर, सुधागड, श्रीवर्धन, माणगाव, महाड या तालुक्यात प्रत्येकी एका ठिकाणी भाताची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. त्याचवेळी जिल्ह्यात गोदामे उपलब्ध असलेल्या सहा ठिकाणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सबएजंट नेमण्यात आले आहेत. त्यात पेण आणि माणगावमध्ये प्रत्येकी एक आणि सुधागड तालुक्यात चार ठिकाणी हमीभावाने खरेदी केली जाणार आहे.

भाताची ऑनलाइन नोंदणीला मुदतवाढ दिल्याने शेतकर्‍यांनी आपल्या विविध विकास कार्यकारी सोयायटीकडे जाऊन किंवा शासनाच्या एनइएमएल या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply