Breaking News

‘ती’ आत्महत्या नव्हे; तर अनैतिक संबंधातून हत्या!

कर्जत धोत्रेवाडीतील तरुणीच्या मृत्यूचे गूढ उकलले

कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यातील धोत्रेवाडी येथील आदिवासी तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी कर्जत पोलिसांनी त्याच गावातील तरुणाला अटक केली आहे. आरोपीने अनैतिक संबंधातून या तरुणीची हत्या केली असल्याचे समोर आले आहे.
कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील धोत्रेवाडीमधील 17 वर्षीय आदिवासी तरुणी पिंकी गणेश मांगे या तरुणीचा मृतदेह 18 एप्रिल रोजी गावाबाहेर 500 मीटर अंतरावर असलेल्या झाडाखाली आढळून आला होता. गळ्याला ओढणीने गळफास घेतलेला मृतदेह पोलिसांंनी ताब्यात घेऊन कशेळे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला होता. त्या वेळी पोलिसांनी गुन्ह्याचा तपास प्राथमिक पातळीवर असल्याने पिंकी मांगे हिच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली होती, मात्र तपासादरम्यान ही आत्महत्या नसून त्या तरुणीचा खून झाल्याचे उघड झाले असून या प्रकरणी गावातीलच अर्जुन गजानन मांगे या तरुणाला अटक करून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धोत्रेवाडी येथील अर्जुन मांगे आणि पिंकी गणेश हे नात्याने बहीण भाऊ असूनही या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. त्यातून 18 एप्रिल रोजी दुपारी अर्जुनने पिंकीला नेहमी भेटतो तसे गावाच्या बाहेर बोलावले होते. त्या वेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि शेवटी अर्जुनने पिंकीचा गळा दाबून खून केला तसेच पिंकीच्या गळ्यात तिचीच ओढणी बांधून तिने आत्महत्या केली असल्याचा दिखावा करून तो कामावर निघून गेला होता. पोलिसांनी तपासचक्र फिरवून अर्जुन मांगे याला अटक केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply