Breaking News

मोबाइलच्या दुकानातून लाखोंचा ऐवज चोरी

पनवेल : वार्ताहर

घरफोड्या करणार्‍या चोरट्यांनी सीवूड्स सेक्टर-4ए मधील जिओ स्टोअर या मोबाइल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील वेगवेगळ्या कंपन्याचे मोबाइल फोन व इतर वस्तू असा तब्बल 12 लाख 22 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. एनआरआय पोलिसांनी या गुन्ह्यातील तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. 

सीवूड्स सेक्टर-46ए मधील श्रीजी हाईट्स (अक्षर टॉवर) या इमारतीत जिओ कंपनीचे मोबाइल फोन, एसेसरीज, स्मार्ट वॉच व सिम कार्ड विक्रीचे दुकान असून या स्टोअरवर काम करणारे कामगार दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर पहाटेच्या सुमारास तिघा चोरट्यांनी जिओ स्टोअर या दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला.

चोरट्यांनी दुकानातील विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल फोन, एसेसरीज, स्मार्ट वॉच व दुकानातील इतर वस्तू असा चोरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पहाटेच्या सुमारास दुकानात तीन चोरटे घुसल्याचे व त्यांनीच हे दुकान साफ केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन  चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply