Breaking News

पेण दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रवींद्र नथुराम पाटील

पेण : प्रतिनिधी

तालुक्यातील दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे रवींद्र नथुराम पाटील विजयी झाले. त्यांनी शेकाप उमेदवारचा पराभव केला.

दादर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक झाली. उपसरपंच पदासाठी भाजपचे रवींद्र नथुराम पाटील आणि शेकापच्या नंदिनी संतोष जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सदस्यांच्या मागणीनुसार यावेळी गुप्त मतदान घेण्यात आले. रवींद्र  पाटील यांना आठ तर नंदिनी जोशी यांना पाच मते पडली. उपसरपंचपदी रवींद्र पाटील निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी घोषित केले. यावेळी गजानन कमल म्हात्रे, माजी सरपंच मोहन परशुराम नाईक, धनाजी महादेव पाटील (आप्पा), ज्ञानेश्वर महादेव म्हात्रे (काका), भगवान मारूती पाटील यांनी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply