पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्याच्या विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे. यामध्ये पनवेल तालुक्यातील खेरणे ग्रामपंचायतीचाही समावेश असून निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज सोमवारी (दि. 26) दाखल केले. या निवडणुकीसाठी 16 ऑक्टोबरला मतदान, तर 17 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
पनवेल तालुक्यातील खेरणे येथे ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपच्या वतीने सरपंचपदासाठी शैलेश बाळराम माळ, तर सदस्यासपदासाठी प्रभाग क्रमांक 1मधून रूपाली चंद्रकांत गोंधळी, राजेंद्र आत्माराम गोंधळी; प्रभाग क्रमांक 2मधून प्रिया विलास गोंधळी, सुरेखा रंजित गोंधळी, अशोक गणपत गोंधळी; प्रभाग क्रमांक 3मधून राजेश शामा माळी, सुभद्रा संतु माळी, अक्षता सचिन पाटील; प्रभाग क्रमांक 4मधून संतोष मुरलीधर गोंधळी, प्रतिभा राजेश माळी, महेश नागेश माळी यांनी आपला उमेदवारी अर्ज पनवेल तहसीलदार कार्यालयात निवडणूक अधिकार्यांकडे सोमवारी दाखल केला.
अर्ज दाखल करतेवेळी भाजप ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, खेरणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बुधाजी माळी, चंद्रकांत बंडू गोंधळी, कोंडीनाथ पाटील, काशिनाथ गोंधळी, के. के. गोंधळी, ज्ञानेश्वर गोंधळी, रमेश माळी, बाळाराम माळी, धोंडीराम पाटील, मधुकर गोंधळी, कृष्णा गोंधळी, नरेश माळी, हिरामण गोंधळी, पांडुरंग माळी, वासुदेव माळी, जगदिश गोंधळी, पुष्पा माळी, चांगुणा माळी, रूपाली गोंधळी, वैशाली गोंधळी, प्रियांका गोंधळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …