Breaking News

तळोजातील दीपक नायट्राईट वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने सन्मानित

लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून अभिनंदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोना काळामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल तळोजा येथील भारत सकपाळे व दीपक नायट्राईट लि. तळोजा या कंपनीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली असून त्यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंटने सन्मानित केले आहे. या बद्दल त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिनंदन केले.

तळोजा, पनवेल येथील औद्योगिक क्षेत्रातील नामवंत कंपनी दीपक नायट्राईट लि. यांनी कोरोना महामारीच्या काळात कंपनीत नियोजनबद्ध पद्धतीने कोरोना प्रतिबंधक वीस कलमी उपाययोजना सातत्याने राबविल्या. यामुळे कार्यस्थळावर शुन्य कोरोना बाधित व शुन्य मृत्यूची नोंद ठेवण्यात तसेच सर्वांची सुरक्षितता अबाधित राहून त्याचा सकारात्मक परिणाम उत्पादन प्रक्रिया सुरळीत रहाण्यावर दिसून आला. यासोबत विविध सामाजिक उपक्रम राबवून सभोवतालच्या नागरिकांचीही काळजी घेण्यात आली. या स्तुत्य उपक्रमाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन) या जागतिक स्तरावरील संस्थेने नोंद घेत त्यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

कंपनीतील कामगार कर्मचार्‍यांबरोबरच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने कंपनीच्या माध्यमातून आरोग्य तथा सुरक्षा विषयक रेली, विविध परिसंवाद, प्रशिक्षण शिबिर, परिसर निर्जंतुकीकरणासाठी मोफत स्वयंचलित निर्जंतुकीकरण पंप, मोफत सॅनिटायझर द्रव, नागरिकांत मोफत मास्कचे वाटप, विभागातील गरीब व गरजू नागरिकांना धान्यांच्या पिशव्यांचे मोफत वाटप, मोफत लसीकरण तसेच लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना मोफत चहा बिस्किटे यांचे वाटप इत्यादी विविध उपक्रम राबविण्यात आले.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply