पनवेल : येथील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयात सालाबादप्रमाणे यावर्षीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
संस्थेचे कार्याध्यक्ष विनायक नरहर वत्सराज यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आुंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. या वेळी संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सुनीता जोशी, उपाध्यक्ष श्याम वालावलकर, सचिव काशिनाथ जाधव, सहसचिव जयश्री शेट्ये, प्रशांत राजे, राजेंद्र शेट्ये, दत्तात्रय जाधव कर्मचारी वर्ग व वाचक सभासद उपस्थित होते.