Breaking News

…अन्यथा सिडकोच्या कार्यालयाला टाळे ठोकू -अॅड. मनोज भुजबळ

नवीन पनवेलमधील समस्यांसंदर्भात भाजप आक्रमक

पनवेल : प्रतिनिधी

नवीन पनवेलमधील तक्रारीकडे दुर्लक्ष करणार्‍या सिडको अधिकार्‍यांना समज देण्यासाठी 6 डिसेंबर 2021 रोजी नवीन पनवेल सिडको कार्यालयावर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेण्यात येणार आहे. लवकरात लवकर कार्यवाही करा अन्यथा सिडकोेच्या कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी दिला आहे.

याबाबत सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, नवीन पनवेलमधील गार्डन व स्ट्रीट लाईट, पनवेल स्टेशन जवळील हायमास्टचे लाईट/दिवे वारंवार तक्रार अर्ज करून सुद्धा न बसवणे, नवीन पनवेल चेंबुर बँकेपासून सेक्टर 15अ पाण्याच्या टाकीपर्यंतचा रस्ता पुन्हा खोदल्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे, कमी दाबाने येणारे पाणी व पाण्याची वेळ कमी करणे ह्या विषयांबाबत नवीन पनवेल, सिडको भवन व रायगड भवन येथील विविध सिडको कार्यालयांकडे वारंवार तक्रार अर्ज करून प्रत्यक्ष भेटून अथवा फोनवर संपर्क करून सुद्धा कोणतेही काम केले जात नाही.

आम्ही नवीन पनवेलमधील सर्वच लोकप्रतिनिधी वारंवार  अधिकारी वर्गाला विनंती अर्ज करीत असतो, परंतु आपले सर्व अधिकारी  पनवेल महानगरपालहकेकडे बोट दाखवून आपले कर्तव्य नाकारण्याचा प्रयत्न करतात. पनवेल महानगरपालिकडे हस्तांतरीत आरोग्य सेवा महानगरपालिका हे योग्य प्रकारे हाताळत असून  पनवेल महानगरपालिकेला त्याबद्दल  महाराष्ट्रात 3 स्टार रँकिंगमध्ये 2रा क्रमांक व संपूर्ण देशातील प्रथम 10 मध्ये स्थान पटकावले आहे. व त्याबद्दल यांचा राष्ट्रपतींकडून सत्कार करण्यात आला  आहे. हस्तांतरीत झालेल्या गार्डनची नव्याने कामे करण्यासाठी टेंडर काढलेली आहेत, परंतु सिडकोने नागरिकांना घरे बांधून विकली प्रचंड नफा कमवला. नागरिकांकडून सर्व्हीस चार्जेस घेतलेत, परंतु आता लोकांना सोई सुविधा पुरविण्यासाठी चाल ढकल करण्यात येत आहे.

याबाबत लवकरात लवकर योग्य ते आदेश द्यावेत अन्यथा 6 डिसेंबर रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नवीन पनवेलमधील सर्व लोकप्रतिनिधी यांचेकडून नवीन पनवेल सिडको कार्यालयाविरुद्ध आंदोलन करून नवीन पनवेल सिडको कार्यालयाला  टाळे  लावण्यात येईल व होणार्‍या सर्व परिणामांची जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहील असे पत्र सिडकोच्या व्यवस्थापकीय संचलकाना देण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply