
पेण : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील पांडापूर गावाजवळ गुरूवारी (दि. 25) एसटी व टेम्पोची समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
पेण कोळीवाडा येथील महेश पाटील हे टेम्पोतून (एमएच-06, एजी-4445) डीजेचे सामान घेऊन मुंबई-गोवा मार्गावरून महाडच्या दिशेने निघाले होते. पांडापूर गावाजवळ बागमांडला-मुंबई एसटी बसची आणि टेम्पोची समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात टेम्पो चालक महेश पाटील यांची आई ताराबाई पाटील (वय 55, रा. पेण कोळीवाडा) या गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर महेश पाटील यांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पेणमधील डॉ. वैरागी यांच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरु आहे.