Breaking News

बाजारभावापेक्षा कमी दरात दिवाळी फराळाचे सामान

दीपावलीनिमित्त पनवेल परिसरात भाजपचा उपक्रम

पनवेल ः रामप्रहर वृत्त
दीपावली सणानिमित्त भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने दिवाळी फराळाचे सामान बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 29) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली येथे करण्यात आले.
या वेळी नगरसेवक बबन मुकादम, अमर पाटील, राजेंद्र शर्मा, जिल्हा परिषेदच्या माजी महिला व बालकल्याण सभापती प्रिया मुकादम, प्रकाश शेलार, अमर ठाकूर, शितू शर्मा, प्रकाश मुंबईकर, संदीप भगत, जमीर शेख, शीतल कदम, दुर्गावती सहानी, प्रणाली यादव, विद्या परांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
दिवाळीनिमित्त कामोठे, कळंबोली, खारघर या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय येथे, तर नवीन पनवेल येथे नगरसेवक संतोष शेट्टी यांचे जनसंपर्क कार्यालय अशा एकूण चार ठिकाणी दिवाळी फराळाचे सामान बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये रवा, मैदा, चणाडाळ, साखर, पोहे, गूळ, डालडा, गोडेतेल आदी वस्तूंचा समावेश आहे.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply