Breaking News

महिला आयपीएलमधून ऑस्ट्रेलियाची माघार

सिडनी : वृत्तसंस्था

पुरुषांच्या क्रिकेट मालिकेच्या पुनःआखणीसंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) वाद सुरू असल्यामुळे ऑस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणार्‍या महिलांच्या इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) माघार घेतली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया वेठीस धरत असल्याचा आरोप बीसीसीआयने केला आहे.

मेग लॅनिंग, एलिस पेरी आणि एलिसा हिली या तीन क्रिकेटपटूंना महिला आयपीएलमध्ये सहभागी होण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मज्जाव केला आहे. 6 ते 11 मे या कालावधीत जयपूर येथे तिरंगी स्पर्धा होणार आहे.

पुरुषांची एकदिवसीय मालिका पुढे ढकलण्यात यावी यासाठी बीसीसीआयवर दडपण आणण्याच्या हेतूने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकारी बेलिंडा क्लार्क (माजी कर्णधार) यांनी हा ई-मेल पाठवला आहे. नव्या दौरा आखणी कार्यक्रमांतर्गत ऑस्ट्रेलियाला जानेवारी 2020मध्ये तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळावी लागणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply