Breaking News

राणा कपूर-प्रियंका गांधींचे कनेक्शन? येस बँक घोटाळ्यात खळबळजनक खुलासा

मुंबई ः प्रतिनिधी

 येस बँकेवर सरकारने आर्थिक निर्बंध लादल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. दीवान हाऊसिंग फायनान्स

कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (डीएचएफएल) मनी लॉण्डरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांना रविवारी (दि. 8) पहाटे अटक केली. ईडीच्या अधिकार्‍यांनी 20 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली असून या प्रकरणात आता नवीन खुलासा समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात येस बँकेचे सीईओ राणा कपूर आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे काही कनेक्शन असल्याचा तपास आयकर विभागाकडून केला जात आहे.

राणा कपूर यांचा ’गांधींज’बरोबर संबंध असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड़्रा यांची पेंटिग्ज यूपीए सरकारदरम्यान राणा कपूर यांनी दोन कोटी रुपयांना खरेदी केल्याची माहिती ’द टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तसमूहाने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. राणा कपूर यांना अटक केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. राणा कपूर व प्रियंका गांधी यांच्यामध्ये झालेल्या या व्यवहाराचा तपास आयकर विभागाकडून करण्यात येत आहे. हे पेंटिग्स खरेदी करण्याचे कारण मात्र अद्याप समोर आले नाही.

भाजपचा आरोप

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सांगितले, भारतातील प्रत्येक आर्थिक घोटाळा ‘गांधीज’शी जोडला आहे. विजय मल्ल्या सोनिया गांधींचे हवाई तिकीट अपग्रेड करतो. राहुल गांधींनी नीरव मोदीच्या ज्वेलरी कलेक्शनचे उद्घाटन केले होते, तर राणाने प्रियंका गांधींची पेंटिंग्ज खरेदी केली आहे.

काँग्रेसचे स्पष्टीकरण प्रियंका गांधी आणि येस बँकेच्या राणा कपूर यांच्यात झालेल्या व्यवहाराची कबुली काँग्रेस पक्षाने दिली आहे, मात्र पक्षाने या दोघांत कनेक्शन वा लिंक असल्याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. पक्षाचे नेते राशिद अल्वी यांनी सांगितले की, यामुळे काय होईल? जर प्रियंका गांधी कोणतीही वस्तू विकतात आणि दुसरा कोणी खरेदी करीत असेल, तर खरेदी करणार्‍याला पाहिले जात नाही. जो पैसे देतो, तो खरेदी करतो, असा बचाव त्यांनी केला आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply