Breaking News

नागोठणे परिसरात अवकाळी पावसाची हजेरी

नागोठणे : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे संकट काही संपता संपत नाही. अवकाळी पावसाच्या सरी कधीही बरसत आहेत. वारंवार वातावरणात होत असलेल्या बदलाचा फटका मात्र शेतकर्‍यांना बसत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला व जो काही शिल्लक राहिला होता तोही आता या अवकाळीने जाण्याच्या मार्गावर आहे. शेतकर्‍याने जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

याआधी झालेल्या पावसात भाताच्या मळणीसह वाल पीक, भाजीचे मळे, आंब्यांवरील मोहर नष्ट झाले होते. शेतकर्‍याने दुबार वाल पीक व भाजीची लागवड केली, मात्र वारंवार होत असलेल्या अवकाळी पावसामुळे तेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा हा लहरीपणा कधी थांबेल. आधीच शेतकरी कर्ज काढून बी, बियाणे, खते, अवजारे खरेदी करतो आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे कर्जाचा डोंगर डोक्यावर घेत आयुष्य काढतो. त्यामुळे प्रशासनाने आतातरी दखल घेत शेतकर्‍यांना पाठबळ द्यावे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply