Breaking News

रोविंग चॅम्पियनशिपमध्ये देविदास पाटील प्रथम

मोहोपाडा ः प्रतिनिधी

एशियन रोविंग व्हर्चुअल इंडोर चॅम्पियनशिप हाँगकाँग चायना येथे 15 ते 18 जानेवारीदरम्यान सुरू असून या स्पर्धेत देवळोली गावच्या देविदास पाटील याने भारत देशाचे प्रतिनिधित्व करून पहिल्याच दिवशी पॅरा इव्हेंट कॅटेगरीत प्रथम क्रमांक पटकावला. त्याने रसायनी-रायगडसह देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. देविदास पाटील याची घरची परिस्थिती गरीब असून तो अपंग आहे, परंतु त्याने अपंगत्वावर मात करीत सुयश संपादन केले आहे. देविदासने चॅम्पियनशिपमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेकांनी त्याचे दूरध्वनीवरून कौतुक केले आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Check Also

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …

Leave a Reply