Breaking News

प्रो कबड्डी : दिल्लीचा हरयाणावर रोमांचक विजय

बंगळुरू ः वृत्तसंस्था

प्रो कबड्डी लीगचा 55वा सामना हरयाणा स्टीलर्स आणि दबंग दिल्ली यांच्यात रोमांचक झाला. दिल्लीने हरयाणाचा 28-25 असा पराभव करीत  विजय नोंदवला. यासह ते पॉइंट टेबलमध्ये दुसर्‍या स्थानावर आले आहेत, तर हरयाणाचा संघ सातव्या स्थानावर आहे. पूर्वार्धानंतर दोन्ही संघ 11-11असे बरोबरीत होते. हरयाणा स्टीलर्सने नवीन कुमारला चांगले खेळू दिले नाही. त्याला त्यांनी चार वेळा बाद केले. दरम्यान, नवीन कुमारला दोन बोनस गुणांसह केवळ तीन गुण मिळवता आले. असे असतानाही दबंग दिल्लीने हरयाणा स्टीलर्सला वरचढ होऊ दिले नाही. हरयाणाचा कर्णधार विकास कंडोलाही अपयशी ठरला. दिल्लीकडून विजयने चार, तर हरयाणा स्टीलर्सकडून मीतू महेंद्रने तीन गुण मिळवले. विजयने सुपर रेड टाकत सामन्यात सर्वाधिक गुण मिळवले. नवीन कुमारला सामन्यात केवळ पाच गुण मिळाले, तर विकास कंडोलाला केवळ तीन गुण मिळाले. बचावात मनजीत चिल्लरने सर्वाधिक तीन गुण मिळवले.दुसर्‍या सामन्यात यूपी योद्धाने तेलुगू टायटन्सला 39-33 असे हरवले. मागील काही सामन्यात अपयशी ठरत असलेल्या प्रदीप नरवालला अखेर सूर गवसला. त्याने यूपी योद्धासाठी 10 गुण घेतले, तर श्रीकांत जाधव, सुरेंदर गिल आणि नितीश कुमार यांनी प्रत्येकी सात गुण घेत त्याला उत्तम साथ दिली. टायटन्सकडून रजनीश दलाल आणि अंकित बेनिवाल यांनी प्रत्येकी नऊ गुण घेतले. तत्पूर्वी यू मुम्बा आणि बंगाल वॉरियर्स यांच्यातील सामना 32-32 असा बरोबरीत सुटला.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply