अलिबाग ः प्रतिनिधी
अलिबागमधील वरसोली गावातील कोळीवाड्यात प्रतिजेजुरी म्हण्ाून ओळख असलेल्या खंडोबा मंदिरात सोमवारी (दि. 2) चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जय मल्हारच्या जयजयकाराने मंदिराचा परिसर दुमदुमला, तर मंदिर परिसरात भंडार्याची उधळण करण्यात आली.
वरसोली कोळीवाड्यात असलेल्या या खंडोबा मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे. या मंदिराचा जीर्णोध्दार नुकताच काही वर्षांपूर्वी करण्यात आला. येथील खंडोबाची भव्य मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. दरम्यान, सोमवारी चंपाषष्ठीच्या पार्श्वभूमीवर मंदिरात खंडोबाचा उत्सव साजरा करताना
अष्टागारातील भाविक उत्सवात सहभागी झाले होते. तत्पूर्वी सहा दिवस आधी भजन, कीर्तन आणि इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंदिराचे पुजारी कमळाकर यांनी विधीवत पूजा करून दुपारी खंडोबाचा जन्मोत्सव साजरा झाला.
भक्तांच्या हाकेला धावणार्या महादेवाने खंडोबाच्या रूपात वरसोलीत निवास केल्याचे सांगण्यात येते, अशी माहिती अरुण मेस्त्री यांनी दिली. खंडोबाचा हा चंपाषष्ठीचा उत्सव गेल्या काही दशकांपासून येथे मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याचे मंदिराचे पुजारी कमळाकर यांनी सांगितले. चंपाषष्ठीनिमित्त आगरी, कोळी, माळी व इतर समाजातील शेकडो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी झाले होते. उत्सवानिमित्त मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.