Breaking News

भाजप अल्पसंख्याक मोर्चा कोकण विभागाची रविवारी पनवेलमध्ये बैठक

राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पार्टीच्या कोकण विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विभागीय बैठक रविवारी (दि. 30) सकाळी 11 वाजता राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जमाल सिद्दीकी यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये होणार असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष सय्यद अकबर यांनी दिली. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीला प्रदेश अध्यक्ष हाजी एजाज देशमुख, सरचिटणीस अतिक खान, जुनैद खान उपस्थित राहणार आहेत.
कोकणात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांचे संघटन मोठ्या प्रमाणात आहे. केंद्रीय नेतृत्वाचे विचार घराघरात बिंबवले जात आहेत. कोकणात भविष्यातील अल्पसंख्याक मोर्चाची कार्यपद्धती पक्षाच्या मूळ प्रवाहात अल्पसंख्याक समाजाला सामावून घेण्याची रणनीती याबद्दल महत्त्वाचे मार्गदर्शन या बैठकीत होणार आहे. राष्ट्रीय, राज्यस्तरीय, कोकण व रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने या बैठकीबाबत अल्पसंख्याक समाजामध्ये मोठी उत्सुकता लागली आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply