Breaking News

श्रद्धा फाऊंडेशनकडून धान्यवाटप

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील सागाचीवाडीमधील आदिवासी कुटुंबांना कर्जत वेणगाव येथील डॉ. भरत वाटवानी यांच्या श्रद्धा फाऊंडेशनच्या माध्यमातून धान्यवाटप करण्यात आले. श्रद्धा फाऊंडेशनकडून आदिवासी वाड्यांत लॉकडाऊन काळात निर्माण झालेल्या स्थितीवर मात करण्यासाठी जीवनावश्यक वस्तू दिल्या जात आहेत. फाऊंडेशनचे कार्यकर्ते ए. सी. बसवराज, शैलेश शर्मा, शाहीन अख्तर, नितीश शर्मा, शकील अहमद, ध्रुव बडेकर आदींनी सागाचीवाडीत मदत वाटप केली. या वेळी अनंता सांबरी, ग्रामपंचायत सरपंच रमेश लदगे, दिनकर तळपे, रूपेश कोंडे, पांडुरंग निरगुडे, संतोष निरगुडे आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply