Breaking News

मेजर ध्यानचंद यांचा मोठा सन्मान

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आता ध्यानचंद यांच्या नावाने दिला जाणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय खेळाडूंना देण्यात येणार्‍या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून हा पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही घोषणा केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही घोषणा केली. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्यासाठी माझ्याकडे देशभरातील अनेक नागरिकांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीसाठी धन्यवाद. त्यांच्या भावनांचा आदर करत आजपासून खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे असेल. भारताचे खेळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर आणि अभिमान मिळवून देण्यामध्ये मेजर ध्यानचंद यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय हा त्यांच्या कार्याचा उचित सन्मान असेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.
जपानमध्ये सुरू असलेल्या टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताचे खेळाडू देशाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. काही खेळाडूंनी टोकियोमध्ये शानदार कामगिरी करत पदक देखील जिंकून दिले. अशात भारतात केंद्र सरकाराने हा एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताने ऑलिम्पिकमध्ये मिळवलेल्या तीन सुवर्णपदक विजेत्या संघात ध्यानचंद होते. ध्यानचंद यांनी करिअरमध्ये एक हजारहून अधिक गोल केले आहेत. 1956 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांचा जन्मदिवस भारतीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply