Breaking News

महाडमधील पूरस्थितीचा प्रश्न जैसे थे

गेल्यवर्षी महाड तालुक्यात पुरोन आहाकार उडवला होता. सावित्री नदिला पूर आल्यामुळे  महाड शहर तसेच आसपासच्या गावांमध्ये पाणी शिरेले होते. महाड शहरात प्रचंड नुकसान झाले. दर पावसाळ्यात येणार्या पुरामळे महाडकरांचे नुकसान होते. त्यावर कायामस्वरूप उपाययेजना करण्याबात चार्चा झाल्या. त्यात सावित्री नदिमधील गाळ काढून तीचे ेपात्र खोल करण्याच कामाला प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले. परंतु पावसाळा सूरू झाला तरी सावित्रीमधी गाळ काढण्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. पावसाळा सुरू झाल्यामुळे गाळ काढण्याचे काम थांबविण्यात आले आहे. गाळ काढण्याचे 40 टक्के काम पुर्ण झाले असून 60 टक्के काम शिल्लक आहे.

आता पावसाळा संपल्यांनतर हे काम सुरू करण्यात येणर आहे. नदिचे पात्र खोल झालेले नही. याचाच अर्थ  जर अतिवृष्टी झाली तर महाड शहरात पूर येणा हे निश्चीत आहे. दरवर्षी पावसळ्यात पूर येतो महाडमध्ये नुकसान होते.  त्यानंतर चार्चा होता. पुढे काहीच होत नाही. येरे माझ्या मागल्या. मागील वर्षी  दोन दिवसात 1 हजार मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडला. यामुळे सावित्री आणि गांधारी नद्यांना भीषण पूर आला. महाड शहर आणि लगतच्या परिसराला महापूराचा वेढा बसला. शहराला जोडणारे सर्व रस्ते पाण्याखाली गेले. त्यामुळे हजारो नागरिक अडकून पडले. शहरात दहा ते बारा फूट पाणी शिरले. संपुर्ण बाजारपेठ पुराच्या पाण्याखाली गेली. घरांचे, कार्यालयांचे, बँकांचे, व्यापार्यांचे मोठं नुकसान झाले. महाडकरांना पूर काही नवीन नाही. पण हा पूर अभुतपूर्व आणि विध्वसंक होता. पुरा मुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. त्यामुळे पूराची दाहकता महाडकरांनी यंदा अनुभवली होती.

दरवर्षी येणार्या पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी काय करावे यावर प्रशासकीय पातळीवर चार्चा झाल्या. काही एनजीओंनी देखील येथे महाडच्या पुरारच्या समसेंवर परिषदा घेतल्या. त्यात काही उपयायोजना सुचविल्या. त्यातही सवित्री नदिच्या पात्रीतीली गाळ काढून नदिचे पात्र खोल करण्याची सूचन केली होती.  सावित्री नदीतील गाळ काढण्याची मागणी महाडकरांनी लावून धरली होती. त्यामुळे जलसंपदा विभागा मार्फत या सावित्री, काळ, गांधारी, भावे नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने गाळाचे सर्वेक्षणही केले होते. यात नद्यामध्ये अंदाजे 26 लाख 50 हजार घनमीटर गाळ साचला आहे असे सांगण्यात आले.  यापैकी 10 लाख 5 हजार घनमीटर गाळ काढण्यात प्रशासकीय यंत्रणांना यश आले आहे. अद्यापही  15 लाख 91 हजार घनमीटर गाळ नदी पात्रात शिल्लक आहे. म्हणजेच गाळ काढण्याचे 40 टक्के काम पुर्ण झाले असून 60 टक्के काम शिल्लक आहे.

पावसाळा सुरु झाल्याने आता सर्व ठिकाणची गाळ काढण्याची कामे थांबविण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरीत गाळ काढण्यासाठी महाडकरांना पावसाळा संपण्यापर्यंत वाट पाहवी लागणार आहे. गाळ काढण्याच्या कामात अनेक प्रशासकीय अडचणी आहेत. काही तांत्रिक अडचणी आहेत. गाळ कढण्याच्या कामामसाठी केवळ एका विभागची परवानगी घ्यावी लागत नही. या तांत्रिक अडचणीमुळचे हे गाळ काढण्याचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. प्रत्येक विभागची नदी पात्रातील गाळ क्षेत्र काही टप्प्यात सिआरझेड क्षेत्रात येत असल्याने त्या ठिकाणचा गाळ काढण्यासाठी पर्यावरण विभागाच्या परवानग्या आवश्यक होत्या. त्या मिळण्यास उशीर झाला. त्यामुळे सिआरझेड क्षेत्रातील गाळ काढता येऊ शकलेला नाही. या परवानग्या वेळेत मिळाल्या असत्या तर उर्वरित गाळ काढण्याची कामे पावसाळ्यापूर्वी उरकता आली असती.

सावित्री नदिच्या पात्रात महाड शहराजवळ दोन बेट आहेत. ती काढवी लागणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अँथॉरीटीकडून  परवानगी मिळणे आवश्यक होते. ही परवानगी मे महिन्याच्या उत्तरार्धात प्राप्त झाली होती. त्यामुळे 15 दिवसात जितका शक्य होऊल तितका गाळ काढण्यात आला आहे. पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील सर्व गाळ निघेल अशी महाडकरांना आशा होती. मात्र गाळ्याचे प्रमाण, पर्यावरण विषयक परवानग्या मिळण्यास झालेला उशीर यामुळे हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. पर्यावरण विषयक परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापुर्वी पुर्ण होऊ शकलेले नाही. सावित्री  नद्यामधील  आत्ता पर्यंत 10 लाख 59 हजार घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. यात सिआरझेड क्षेत्रात मोडणार्या भागातील 8 हजार 100 घन मीटर गाळाचा समावेश आहे. उर्वरीत गाळ काढण्याचे काम पावसाळ्यानंतर केले जाईल.

आणि महाडकर अस्वस्थ

महाड शहाराला पूर नवीन नाही. पावासाळ्यात महाड शहरात पूर आला नाही महाडकर अस्वथ होता. पंरतु मागिल काही वर्षात परिस्थिती बदलली आहे. मोठ पूर आल्यामुळे महाडकरांचे विशेषतः महाड बाजरपेठेतील व्यापार्यांचे नुकसान होत आहे. गेली अनेक वर्ष महाडकर यावर या समस्येवर कायम उपयायोजना करण्याची मागणी करत आहेत. पंरतु त्याकडे दर्ल्रक्ष केले जाते. पूर आला की चार्चा होते. मागली वर्षा आलेल्या पुरमुळे काही तातडीची कामे होतीली असे वाटत होते. परंतु तसे काही झाले नाही. बिचार्या महाडकरांना कुणी वाली नाही.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply