Breaking News

जासईत शुक्रवारी प्रवेशद्वार उद्घाटन समारंभ

उरण : प्रकल्पग्रस्तांचे श्रद्धास्थान लोकनेते दिवंगत दि. बा. पाटीलसाहेब, 1984च्या आंदोलनातील पाच हुतात्मे यांच्या स्मरणार्थ महात्मा फुले सामाजिक प्रबोधन व परिवर्तन प्रतिष्ठानतर्फे उरण तालुक्यातील जासई येथे उभारण्यात आलेल्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन आंदोलनातील रणरागिणी नेत्या भारतीताई पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 24) सकाळी 10.30 वाजता होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 9 वाजता जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनियर कॉलेज (दहागाव विभाग) जासई प्रांगणातील लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्यास, प्रांगणातील पंच विभूती व कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यास आणि हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल, तर 10 वा. जिजामाता हॉस्पिटल येथील जिजाऊंच्या अर्धपुतळ्यास व हॉस्पिटलमधील लोकनेते दि. बा. पाटील यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल पाटील यांनी केले आहे.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply