पनवेल : वार्ताहर
सामाजिक कार्यकर्त्या आणि तळागाळातील लोकांच्या मदतीसाठी नेहमी कार्यरत असणार्या मुंबईमधील रंजना गायकवाड यांची ऑल इंडिया सिफेरस या आंतराष्ट्रीय कामगार संघटनेमध्ये महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. याबद्दल राजकीय सामाजिक सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या वेळी युनियनचे अध्यक्ष संजय पवार व कार्याध्यक्ष अभिजित सांगळे आणि इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.