Breaking News

कळंबोली-अंजप रस्त्याची दुर्दशा

कडाव : प्रतिनिधी

तालुक्यातील कळंबोली ते अंजप हा सुमारे दोन ते तीन किलोमीटर लांबीचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून नादुरुस्त झाला असून, त्यामुळे या रस्त्यावरून नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थांनाही खडतर प्रवासाला सामोरे जावे लागत आहे.

कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागातील व ग्रामपंचायत हद्दीतील अंतर्गत रस्ते विकासापासून अनेक कोस दूर आहेत. त्यामुळे ग्रामस्थ व प्रवासी वर्गात लोकप्रतिनिधींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नसरापूर ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील कळंबोली गाव व बोरीवली ग्रामपंचायत हद्दीतील अंजप गाव या दोन गावामधील अंतर अंदाजे दोन ते तीन किलोमीटर आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजाग खड्डे पडले असून, या रस्त्यावर पावसाळ्यात चिखलाचे तर उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य असते. या रस्त्याच्या दुरूस्तीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संबंधीत यंत्रणेकडे पाठपुरावा करुनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ती समस्या दूर होणार कधी, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.

कर्जत व नेरळ  रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असणारा कळंबोली – अंजप रस्ता अत्यंत नादुरुस्त झाला असून, त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दूर्लक्ष झाले आहे. स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांची गरज ओळखून या रस्त्याचे काम होणे अत्यंत गरजेचे आहे.

-विलास थोरवे, सामाजिक कार्यकर्ता, अंजप, ता. कर्जत

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply