Breaking News

नियमित व्यायाम, योग्य आहार जीवनाचा अविभाज्य भाग -डॉ. सोनल पुरोहित

पनवेल : वार्ताहर

पोलीस खात्यामध्ये कार्यरत असाल किंवा इतर ठिकाणी नोकरी किंवा व्यवसाय करीत असाल असे असले तरी प्रत्येक व्यक्तीसाठी नियमित व्यायाम व योग्य आहार हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे प्रतिपादन लाईफ स्टाईल या विषयाच्या विशेष तज्ज्ञ डॉ. सोनल पुरोहित यांनी खांदा कॉलनी येथे केले. पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील यांच्या मार्फत आयोजित परिसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी परिमंडळ-2 (पनवेल)चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कोकाटे आदी उपस्थित होते. डॉ. सोनल पुरोहित यांनी सांगितले की, जीवनात नियमित व्यायाम व योग्य आहार हे महत्त्वाचे आहे. कारण प्रामुख्याने पोलीस खात्यामध्ये कार्यरत असताना त्यांना वेळेचे बंधन नसते. 24 तास कर्तव्य बजावत असल्याने त्यांच्या व्यायाम व आहारावर परिणाम होतो. महिला कर्मचारी व महिला कुटुंबीयांनासुद्धा त्यांनी महत्वपूर्ण अशी माहिती व आरोग्यसंबंधी काळजी घेण्याच्या टिप्स दिल्या. तसेच त्यांनी काही प्रात्यक्षिके सुद्धा सादर करून दाखविले. त्याचप्रमाणे उपस्थित कर्मचार्‍यांनी आरोग्यविषयक विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी समर्पक व योग्य उत्तरे दिली व मार्गदर्शन केले.

या परिसंवादामुळे उपस्थितांना योग्य माहिती मिळाली असून त्यांच्या कुटुंबियांना येणार्‍या शंकांचे निरासन झाल्याचे समाधान मिळाले आहे. आगामी काळात सुद्धा पोलीस खात्यातील कर्मचारी व अधिकार्‍यांसह त्यांच्या कुटुंबियांसाठी अश्या प्रकारचे विविध उपक्रम राबवणे सुद्धा गरजेचे आहे.

-रवींद्र दौंडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल तालुका पोलीस ठाणे

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply