Breaking News

एडका पॉईंटचे सातत्याने बांधकाम अन् पडझडही

पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर-वाई-सुरूर राज्यमार्ग क्र. 42 या रस्त्याच्या रूंदीकरणादरम्यान डोंगर कापण्यात आल्याने सुटलेला मातीचा ढिगारा रस्त्यावर येऊन वाहतुकीसाठी आंबेनळी घाट बंद ठेवण्यात आला होता. याच ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने सध्या नव्याने मोरीचे बांधकाम करून तेथे तयार झालेल्या एडका पॉईंट धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना सोयीस्कर अशी मोरी बांधली असली तरी अद्याप ही मोरी नादुरूस्त असून तेथे मोरी असलेल्या रस्त्यावरून वाहने नेणे जिकिरीचे झाल्याने बहुतांशी वाहने दरीलगतच्या साईडपट्टीवरून ये-जा करीत आहेत. संबधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कर्मचार्‍यांची बस येथे थांबली होती अथवा नाही, याबाबत अपघातातून एकमेव बचावलेले अधिकारी प्रकाश सावंत देसाई यांच्या संदिग्ध विधानांमुळे वाद निर्माण झाल्यानेच आंबेनळी घाटातील या मोरीबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली. पोलादपूर-वाई-सुरूर राज्यमार्ग क्र. 42 या रस्त्यापैकी रायगड जिल्ह्यातील साधारणत: 24.200 कि.मी.रस्ता पोलादपूर येथील नव्याने सुरू झालेल्या बांधकाम उपविभागाच्या अखत्यारीमध्ये येतो. तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता अतिवृष्टीमुळे रस्त्यांची धूप मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे रस्त्यावरील डांबर, खडी वाहून जाण्याचे प्रमाण वाढते, ही वस्तुस्थिती असली तरी दर्जा आणि गुणवत्ता नियंत्रणामुळे हा उपविभाग बंद करण्याची वेळ अद्याप शासनावर आली नाही. या उपविभागाकडे सर्वात कमी म्हणजे 69.200 कि.मी. अंतराच्या रस्त्यांची देखभाल व दुरूस्ती आणि बांधकाम असल्याने कामाचा दर्जा चांगला ठेवण्याकडे काटेकोरपणे लक्ष पुरविता येत असूनही केवळ निधीची अनुपलब्धता अडचणीची ठरत आहे. दोन वर्षांपूर्वीच्या आमसभेमध्ये डोंगराच्या भागातील माती जेसीबीच्या सहाय्याने उकरून या रस्त्याचे रूंदीकरण करण्यासाठी झालेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगून प्रस्तुत प्रतिनिधीने आता डोंगर उकरलेल्या भागातून दरवर्षी पावसामध्ये मातीचे ढिगारे कोसळू नये, यासाठी गॅबियन स्ट्रक्चरसारखे कोकण रेल्वेमार्गावर तसेच समुद्रकिनारी उभारण्यात येणारी धूपप्रतिबंधक उपाययोजना करण्याची सूचना केली होती. आमसभेने या सूचनेला मान्यता देऊनही त्याबाबत केवळ प्रस्ताव सादर करण्यापलिकडे कोणतीही कार्यवाही झाली नाही. अनेक वर्षांपासून पावसाच्या संततधारेमुळे आंबेनळी घाटात पोलादपूरपासून 22 कि.मी. अंतरावर चिरेखिंड गावालगत एडका पॉईंट धबधब्यासोबत दरड कोसळली. डोंगराकडील बाजू कापून झालेल्या रूंदीकरणाच्या ठिकाणाहून दरड कोसळल्याची ही घटना घडली. याठिकाणी काही काळ एकतर्फी वाहतूक सुरू राहिली होती. हा मातीचा ढिगारा हटविण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात पुन्हा मातीचा ढिगारा कोसळल्याने आंबेनळी घाटातील वाहतूक एकेरी सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे याठिकाणी जेसीबी आणि डंपरद्वारे मातीचा ढिगारा हटविण्यादरम्यान थोडावेळी विश्रांती घेऊन तेथे आलेल्या वाहनांना मार्गस्थ होऊ दिले जात होते. दरड कोसळलेल्या ठिकाणी एक नैसर्गिक धबधबा तयार झाल्याने कोसळणार्‍या पाण्यासोबत दरडीचा ढीगदेखील वाढत होता. या मोरीचे बांधकाम म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी याठिकाणी रस्ता रूंदीकरणाच्या प्रयत्नात डोंगराकडील बाजूचे उत्खनन करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन कोसळलेली दरड हटविण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सद्यस्थितीत या धबधबा तयार झालेल्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने मोरी बांधण्यासाठीचे गेले सात वर्ष चालविलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. धबधब्यावरील मोरीवरील रस्त्यावरून वाहने ये-जा करीत नसून साईडपट्टीलगतच्या भरावावरून ये-जा करीत असल्याचे वास्तव अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पोलादपूर उपविभागाच्या निदर्शनास आलेले नाही. दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या कर्मचार्‍यांची बस येथे थांबली होती अथवा कसे, याबाबत चर्चेला उधाण आल्यानंतर या मोरीची चर्चा सुरु झाली. मात्र, ही मोरी एवढी चर्चेचा विषय ठरूनही खराब अवस्थेत असल्याचे शल्य पोलादपूर उपविभागाच्या बांधकाम विभागाला जराही वाटत नाही. अलिकडेच, सणाच्या पार्श्वभूमीवर या मोरीवरून जाणार्‍या असंख्य वाहनांना खड्डे आणि उंचवटयांमुळे दणके बसून प्रवाशांनी रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला लाखोल्या वाहिल्या आहेत. सहा वर्षांपूर्वी पावसाच्या संततधारेमुळे आंबेनळी घाटात पोलादपूरपासून 22 कि.मी. अंतरावर चिरेखिंड गावालगत धबधब्यासोबत दरड कोसळली. डोंगराकडील बाजू कापून झालेल्या रूंदीकरणाच्या ठिकाणाहून दरड कोसळल्याची ही घटना घडली. याठिकाणी काही काळ एकतर्फी वाहतूक सुरू राहिली होती. हा मातीचा ढिगारा हटविण्यापूर्वीच मोठया प्रमाणात पुन्हा मातीचा ढिगारा कोसळल्याने आंबेनळी घाटातील वाहतूक एकेरी सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे याठिकाणी जेसीबी आणि डंपरद्वारे मातीचा ढिगारा हटविण्यादरम्यान थोडावेळी विश्रांती घेऊन तेथे आलेल्या वाहनांना मार्गस्थ होऊन दिले जात होते. दरड कोसळलेल्या ठिकाणी एक नैसर्गिक धबधबा तयार झाल्याने कोसळणार्‍या पाण्यासोबत दरडीचा ढीगदेखील वाढत होता. ती मोरी एका धारेच्या छोटया धबधब्याचे पाणी वळणावरील रस्त्यावरून वाहू लागल्याने रस्त्याचे डांबरीकरण उखडले जात असल्याच्या सातत्यातून बांधण्याची गरज निर्माण झाली होती. मात्र, नियोजित नवीन मोरीचा आकार मोठा असताना या भागातील डोंगरातील मातीचे उत्खनन करण्यात आले आणि चार वर्षांपूर्वी पावसाळयात याठिकाणी अचानक मोठा धबधबा तयार झाला. कोट्यवधी रूपयांचा निधी याकामी खर्च होऊनही ही परिस्थिती आजही कायमच आहे. पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर-वाई-सुरूर राज्यमार्ग क्र.42 या रस्त्याच्या रूंदीकरणादरम्यान डोंगर कापण्यात आल्याने सुटलेला मातीचा ढिगारा रस्त्यावर येऊन वाहतुकीसाठी आंबेनळी घाट बंद ठेवण्यात आला होता. याचठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने सध्या नव्याने मोरीचे बांधकाम करून तेथे तयार झालेल्या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांना सोयीस्कर अशी मोरी बांधली असली तरी अद्याप ही मोरी नादुरूस्त असून तेथे मोरी असलेल्या रस्त्यावरून वाहने नेणे जिकिरीचे झाल्याने बहुतांशी वाहने दरीलगतच्या साईडपट्टीवरून ये-जा करीत आहेत. दरवर्षी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्ता खचणे तर पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरूर मार्गावर आंबेनळी घाटात दरडी कोसळणे यामुळे दळणवळणात अडथळे निर्माण करणार्‍या घटनांचा अहवाल नैसर्गिक आपत्ती निवारणाच्या कामी समाविष्ट नसल्याचे दिसून येते.

-शैलेश पालकर

Check Also

‘कहो ना… प्यार है’ला पंचवीस वर्ष झालीदेखील!

अगदी कालपरवाची गोष्ट वाटते. मनोरंजन उपग्रह वाहिन्यांवर अवघ्या काही सेकंदाच्या एका तजेलदार नवीन टीझरने आपलं …

Leave a Reply