अलिबाग : प्रतिनिधी
निरूपणकार सचिन धर्माधिकारी यांचा 3 मार्च रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 1) स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभाग व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी शासनाच्या वतीने या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. त्यानंतर स्वच्छता अभियान सुरू झाले. या वेळी सर्व सरकारी कार्यालये, अलिबाग शहर, अंतर्गत रस्ते, समुद्र किनार्याची स्वच्छता करण्यात आली. या अभियानात 2102 श्रीसदस्यांनी सहभाग घेऊन 40 वाहनांच्या सहाय्याने 28.450 टन कचरा गोळा केला व त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यात प्रामुख्याने वृक्ष लागवड व संवर्धन, आरोग्य व रक्तदान शिबिर, दाखले व शैक्षणिक साहित्य वाटप, अंध व मूकबधीर विद्यार्थांना मदत, उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर, आपद्ग्रस्तांना मदत यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रतिष्ठानमार्फत व्यापक प्रमाणात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत शासनाने ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची स्वच्छतादूत म्हणून निवड केली आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …