Breaking News

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन

खारघर ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात शास्त्रामधील नोबेल लॉरीएट या विषयावर मंगळवारी (दि. 18) पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन घेण्यात आले. महाविद्यालयातील शास्त्र शाखेतील 21 विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर सादरीकरण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व मार्गदर्शन केले. या पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनचा प्रमुख हेतू विद्यार्थ्यांमध्ये भाषा कौशल्या विषयी जनजागृती करणे, तसेच सादरीकरणाचे कौशल्य विकसित करणे हे होते. या पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनचे आयोजन शास्त्र शाखेच्या प्रमुख प्रा. महेश्वरी झिरपे यांनी केले, तसेच प्रा. नीलम लोहकरे, प्रा. रूपाली नगारेकर, प्रा. सफिना मुकादम, प्रा. शुभांगी वाकसे व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले व पुढील
उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply