आकाश जुईकर यांचा मदतीचा हात
मोहोपाडा : प्रतिनिधी – रसायनी परिसरात गोरगरिबांच्या हाकेला धावणारे भाजपचे वासांबे पंचायत समिती अध्यक्ष व भाजप कामगार विभागाचे सरचिटणीस आकाश अमृत जुईकर यांनी मोहोपाडा पंचशिलनगर, खाने आंबिवली, नवीन पोसरी व परीसरातील आदिवासी बांधव, कलर काम करणारे कामगार, रोजंदारी करणारा कामगार वर्ग व गरजू गोरगरिबांना धान्यासह किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.
यात तांदूळ, चहापावडर, बिस्किट, तिखट मसाला, गोडातेल, साबण, कांदे आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वेळी आकाश जुईकर यांनी पंचशिलनगरमधील 90 कुटूंबांना तर शंभरपेक्षा जास्त आदिवासी बांधव व इतर गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन त्यांच्या कुटूंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. वाटप करताना आकाश जुईकर यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्या भाग्यश्री पवार, समीर रसाल, पांडुरंग पवार, विशाल जुईकर व मित्रपरिवार उपस्थित होते.
माणगावच्या गोरेगाव विभागातर्फे वस्तूंंचे वाटप
माणगाव ः प्रतिनिधी – कोरोनाच्या संकटकाळात भारतीय जनता पक्ष माणगाव-गोरेगाव विभागातर्फे गोरेगावमधील कुंभार आळी, हौदाची आळी, चिंचवली वाडी तसेच नागाव, भिंताड येथे गरीब-गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या वेळी माणगाव तालुका भाजप अध्यक्ष आप्पासाहेब ढवळे, भाजप रायगड जिल्हा चिटणीस नाना महाले, गोरेगाव विभाग भाजप अध्यक्ष युवराज मुंढे, भाजप अल्पसंख्याक मोर्चा चिटणीस आदमभाई डावरे, यशवंत कासरेकर, मारुती कासरेकर, भाजयुमो उपाध्यक्ष जहेंद्र मुंढे, माणगाव तालुका भाजयुमो सरचिटणीस दिनेश गोरीवले, निलेश राशीनकर, सुरज जाधव, प्रसाद महाडिक, संदेश पंदिरकर आदी उपस्थित होते.
महापालिका सफाई कामगारांना सोयीसुविधा पुरवाव्यात -कुसुम पाटील
कळंबोली : प्रतिनिधी – कोरोना विषाणूने देशात, राज्यात थैमान घातले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील प्रशासन व्यवस्था जोमाने काम करीत आहे. जीव धोक्यात घालून सफाई कर्मचारी जनतेची सेवा करीत आहेत. या कर्मचार्यांना सोयी सुविधांपासून वंचित ठेवले आहे. प्रशासनाने त्यांच्या आरोग्याची काळजी घेताना आपल्या कुटूंबाचे सदस्य याचा विचार करून त्यांना सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका कुसुम पाटील यांनी महानगरपालिकेकडे केली आहे.
पालिका क्षेत्रातील सफाई कामगाराना तसे पालिकेने वार्यावर सोडले आहे. गेली सात दिवसापूर्वी जीवावर उद्दार होवून तात्पुरत्या स्वरुपात काम करणार्या या कामगारांना सुरक्षिततेच्या कोणत्याही सुविधा देण्यात न आल्याने काम बंद आंदोलन केले होते. विशेषतः या कामात अंग मेहनतीने काम करणारे सफाई कामगार विविध ठिकाणी सोयी सुविधा विना काम करीत आहेत.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात जंतूनाशक औषधे फवारणी सुरू आहे. या कामासाठी जवळजवळ 80 कामगार खांदा कॉलनीत कार्यरत आहेत. कोरोनाच्या साथीत ते आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. आणीबाणी परिस्थिती कोणत्याही परिस्थितीत कोरोनावर विजय मिळवायचाच हा एकच उद्देश ठेवून काम करत आहेत. मग त्यावेळी वेळ न वाया घालविता रस्त्यावर कुठे मिळेल त्या ठिकाणी डबा खात आहेत. पाणी पिण्यासाठी कुठल्या तरी सोसायटीचा सहारा घेत आहेत. विशेषतः या वेळी महिला कर्मचार्यांना मोठ्या अडचणी येत आहेत.
प्रात:विधीसाठी देखील कोणतीही सोय नाही. भर उन्हात जंतुनाशक औषधे फवारणी केल्यानंतर कुठे मिळेल तेथे झाडाच्या आडोसा घेवून किंवा एखाद्या नगरसेवकांच्या कार्यालयात विश्रांती घ्यावी लागते, निदान कोरोनो आजाराच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेने या सफाई कामगारांसाठी तातडीने सोयी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका कुसुम पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
तळोजा आदिवासी वाडीत धान्यवाटप
तळोजा : रामप्रहर वृत्त – महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्याला केलेल्या आवाहनानुसार उत्तर रायगड भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी प्रत्येक मंडलाला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटात आलेल्या तसेच गरीब गरजू नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्याचे आवाहन केले.
त्यानुसार तळोजा आदिवासी वाडीतील नागरिकांना रविवारी (दि. 5) दोन किलो तांदूळ, एक किलो डाळ, एक किलो साखर, एक लिटर तेल, एक किलो कांदे, एक किलो बटाटे अशा 60 पॅकेटचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप खारघर तळोजा मंडल उपाध्यक्ष निर्दोष केणी यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आदिवासी वाडीत जाऊन वाटप केले.
आमदार गणेश नाईक यांच्याकडून गरिबांसाठी 600 टन धान्य
नवी मुंबई : बातमीदार – कोरोनामुळे उद्भवलेल्या या कठीण काळात गरजू नागरिकांसाठी आमदार गणेश नाईक धावून आल्याचे दिसून येते. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी या समाज बांधवांना धान्यरुपी मदतीचा हात देऊ केला आहे. एकूण 600 टन धान्य गरीब आणि गरजूंपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
नवी मुंबईतील सर्व प्रभागांमधील गरजूंना धान्य वितरित केले जाणार असल्याची माहिती मिळते आहे. परंतु हे धान्य वितरित करताना नागरिकांना एका ठिकाणी न बोलावता सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करून गरजू नागरिकांच्या घरोघरी ते धान्य त्यांच्यापर्यंत पोहोचवावे, अशी सूचना देखील लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी दिल्याचे समजते. त्याचबरोबर ज्या-ज्या व्यक्ती आणि संस्थांना शक्य आहे. त्यांनी गरीब आणि गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा दिलासा देण्याचे आवाहन देखील आमदार गणेश नाईक
यांनी केले आहे.
भाजप नेते भगवान गायकर यांच्याकडून अत्यावश्यक सेवा बजावणार्यांना अन्नवाटप करण्यात आले.