पनवेल ः वार्ताहर
पनवेल तालुक्यात 13 ते 30 सप्टेंबरदरम्यान कुष्ठरोग व क्षयरोग निर्मूलन अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक संचालक डॉ. आर. एच. बाविस्कर यांनी दिली. मागील दोन वर्षांमध्ये पनवेल तालुक्यातील 216 कुष्ठरोगी बरे झाले आहे आहेत, तर चालू वर्षी पनवेलमधील 121 कुष्ठरुग्ण उपचार घेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत कुष्ठरोग शोधमोहीम व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. तालुके व महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम राबविण्यासाठी तीन लाख 86 हजार 400 लोकांचे सर्वेक्षण होणार असून त्यासाठी एकूण 276 आरोग्य पथके व 55 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. तालुक्यातील एकूण 77 हजार 280 घरांमध्ये सर्वेक्षण होणार आहे.