Breaking News

आज गव्हाण, मोर्बे, नेरे येथे प्राथमिक तपासणी शिबीर

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 16 ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या अनुषंगाने प्राथमिक तपासणी शिबिर रविवारी (दि. 2) तालुक्यातील मोर्बे (डांगर्णेश्वर मंदिर), गव्हाण (ग्रामपंचायत हॉल) आणि नेरे (समित्र गणेश उत्सव मंडळ) येथे होणार आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत होणार्‍या या महाशिबिरात सर्वसाधारण रोग, महिलांचे आजार, हृदयरोग, हाडांचे रोग, मधुमेह, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, हिमोग्लोबिन, बालरोग, त्वचा व गुप्तरोग तपासणी, दंतरोग तपासणी, नाक-कान-घसा, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, कॅन्सर तपासणी, क्षयरोग तपासणी आणि औषधोपचार मोफत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आयुष्यमान भारत डिजिटल कार्डसुद्धा या शिबिरात तयार करून देण्यात येणार आहेत. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply