Breaking News

पंतप्रधानांकडून मोरबी दुर्घटनास्थळाची पाहणी

मोरबी : वृत्तसंस्था
गुजरातच्या मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला 100 वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याची घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली होती. या घटनेत 130पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी (दि. 1) भेट देत पाहणी केली.
पंतप्रधान मोदी तीन दिवसांच्या गुजरात दौर्‍यावर आहेत. त्यांनी सोमवारी रात्री गांधीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत पंतप्रधानांनी मोरबी दुर्घटनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर मंगळवारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करून माहिती घेतली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल सोबत होते.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply