अॅडलेड : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात भारताचा सामना बुधवारी (दि. 2) बांगलादेशशी होणार आहे, पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार या दिवशी अॅडलेडमध्ये पावसाची 60% शक्यता आहे, तर मैदान दिवसभर काळ्या ढगांनी झाकलेले असेल.
भारताने यंदाच्या विश्वचषकातील पाकिस्तान आणि नेदरलँडविरुद्ध सलग दोन विजय नोंदविले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मात्र भारतीय संघाचा पराभव झाला. भारताचे आता ग्रुप स्टेजमध्ये दोन सामने बाकी आहेत, पण हवामान पाहता भारताचा उपांत्य फेरीचा रस्ता इतका सोपा होणार नाही असे दिसते. टीम इंडियाचा पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध अॅडलेडमध्ये होणार असून या सामन्यात पावसाचे सावट आहे. स्थानिक वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 6.30 वाजता सुरू होईल. अॅडलेडच्या मैदानावर संध्याकाळी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. रात्री आणखी पाऊस पडू शकतो.
बांगलादेशविरुद्ध सामना पावसामुळे वाहून गेला तर टीम इंडियाला फक्त एक गुण मिळेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारत गुणतालिकेत चार गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. भारताला बांगलादेशविरुद्ध एक गुण मिळाल्यास टीम इंडियाचे केवळ पाच गुण होतील जे उपांत्य फेरी गाठण्यासाठी अपुरे आहे. अशा स्थितीत भारताला ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध विजयाची नोंद करावी लागेल.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …