Breaking News

डॉ. सतीश वैरागी यांना दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधी

कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे अध्यक्ष डॉ. सतीश वैरागी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्यामार्फत दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्कार दादासाहेब फाळके संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किल्ल्याणजी यांच्या हस्ते मुंबई अंधेरी येथे देण्यात आला.

महाराष्ट्रामध्ये उत्कृष्ट समाजसेवा करणारे तसेच कोविडमध्ये जिवाची पर्वा न करता रुग्णांसाठी सतत कार्यरत असणार्‍या व्यक्तींना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोरोनामुळे भव्य कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना संदेश पाठविला.

डॉ. सतीश भालचंद्र वैरागी यांनी सामाजिक,धार्मिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्यसंस्थावर त्यांनी विशेष ठसा उमटवला आहे. वैरागी यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व तेली समाजबांधव कडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply