Sunday , September 24 2023

शेतकर्‍यांना भात विक्री पर्यायाने बोनस

मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे शेतकर्‍यांनी मानले आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील शेतकर्‍यांना भात खरेदीच्या अनुषंगाने बोनस मिळवून देण्यात आला असून या शेतकर्‍यांनी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे आभार मानले.
शासकीय आधारभूत भात खरेदी योजनेंतर्गत जवळच्या भात खरेदी केंद्रावर भात विक्रीसाठी नोंदणी सुरू होती. पनवेल तालुक्यात 2070 शेतकरी असून कोट्यापेक्षा भात खरेदी झाल्याचे कारण देत भात खरेदी बंद करण्यात आली होती. या संदर्भात शेतकरी भात खरेदी करून घ्यावी यासाठी वारंवार केंद्रावर फेर्‍या मारत होते, मात्र त्यांच्या पदरी निराशा पडत होती. त्यातील काही शेतकर्‍यांनी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची भेट घेतली. त्यानुसार त्यांनी हा विषय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्याकडे मांडला असता त्या अनुषंगाने शासकीय आधारभूत भात खरेदी योजनेंतर्गत खरेदी मर्यादा वाढवावी किंवा पर्यायाने बोनस द्यावा, अशी मागणी दोन्ही आमदार महोदयांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती.
या विषयावर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तत्काळ कार्यवाही केली. त्या अनुषंगाने ज्या शेतकर्‍यांचा भात खरेदीसाठी घेता आला नाही त्या जवळपास 270 शेतकर्‍यांना पर्याय म्हणून बोनस रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. त्याबद्दल शेतकर्‍यांनी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे आभार मानले.

भातपीक खरेदी न झाल्याने घरातच पडून होता. त्यामुळे मोठी चिंता लागली होती, पण पर्यायाने बोनस रक्कम मिळाल्याने दिलासा मिळाला. मी या संदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचे आभार मानतो.
-संजय कोंडिलकर, शेतकरी

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply