Breaking News

दिल्लीतील ‘त्या’ कार्यक्रमात रायगडातील 14 जणांचा सहभाग

अलिबाग : दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या तबलिकी-ए-जमातीच्या धार्मिक कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील 14 जणांनी सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. या संमेलनात भाग घेतलेल्यांपैकी देशभरातील 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे रायगडकरांची डोकेदुखी वाढली आहे. या 14पैकी एक जण जिल्ह्यात परतलेला नाही आणि एकाचा शोध घेण्यात येत आहे, तर उरलेल्या 12 जणांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. हे सर्व जण पनवेलचे रहिवासी असल्याचे वृत्त आहे. कोरोनाचा फैलाव इतरत्र वेगाने होत असताना रायगड जिल्ह्यात कोरोना बर्‍यापैकी नियंत्रणात होता, मात्र आता रायगडकरांना चिंता व्यक्त  होत आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply