अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग चेंढरे येथे जिल्हा स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका ही नूतन वास्तू दिमाखात उभी राहिली आहे. या वास्तूचे उद्घाटन रायगड किल्ला विकास आराखडा प्राधिकरणचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि. 3) झाले.
या कार्यक्रमास कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, मुख्याधिकारी अंगाई साळुंखे आदी उपस्थित होते.
या वेळी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी पुस्तकांचा संच भेट म्हणून विनामूल्य देण्यात आला.
Check Also
दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन
अलिबाग ः प्रतिनिधी फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा दणदणाट, लेझीम पथके तसेच गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात अवघ्या …