Sunday , October 1 2023
Breaking News

आप्पा बारणे यांच्या प्रचाराला पनवेलमधून उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराला आता चांगलाच वेग आला असून पनवेल शहरामध्येसुद्धा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित येऊन घराघरात जावून प्रचार करीत असल्याने बारणे यांचा प्रचार शहरात झंझावती असल्याचे दिसून येत आहे.

भाजपा शहर चिटणीस नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका नीता माळी, शिवसेना महिला आघाडीच्या अर्चना कुलकर्णी, सुजन मुसलोणकर, मंदार काणे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी प्रभाग क्र. 18 व 19मध्ये प्रचारात सक्रिय झाले असून महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते हिरीरीने प्रचार करताना दिसून येत आहेत. प्रत्येक घराघरामध्ये श्रीरंग बारणे यांची पत्रके वाटली जात आहेत, तसेच

धनुष्यबाणासमोरील बटन दाबण्याचे आवाहनसुद्धा नागरिकांना करण्यात येत आहे. श्रीरंग बारणे यांनी गेल्या 5 वर्षात पनवेल परिसरासाठी केलेली कामे त्याचप्रमाणे आ. प्रशांत ठाकूर यांनी केलेला पनवेलचा कायापालट तसेच सत्तेत असलेले भाजपा यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेली विकासाची कामे त्यामुळे पनवेलकरांचा महायुतीवर ठाम विश्वास असून या निवडणुकीतसुद्धा ते बारणेंच्या मागे उभे राहून कोणत्याही परिस्थितीत त्यांना विजयी करतील, असा निर्वाळा या वेळी शहर चिटणीस नितीन पाटील यांनी प्रचारादरम्यान दिला. प्रभाग क्र.18 व 19 परिसरात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा घराघरात जावून प्रचार करताना भाजपा शहर चिटणीस नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेविका नीता माळी, शिवसेना महिला आघाडीच्या अर्चना कुलकर्णी, सुजन मुसलोणकर, मंदार काणे यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.

Check Also

वुशु स्पर्धेत रामशेठ ठाकूर विद्यालयाचे वर्चस्व; 11 सुवर्णांसह एकूण 32 पदकांची कमाई

खारघर : रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी …

Leave a Reply