पेण : प्रतिनिधी
खोपोलीकडून पेणकडे येणार्या एसटी बसला गागोदेजवळ समोरून येणार्या टँकरने धडक दिल्याने दोन प्रवाशांचा मृत्यू, तर चालक-वाहकासह 42 जण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि. 11) सकाळी सातच्या सुमारास घडला.
खोपोलीहून एसटी बस (एमएच 20-बीएल 0547) पेणकडे येत होती. ही बस गागोदेजवळील वळणावर आली असता तिला समोरून भरधाव वेगात आलेल्या टँकरने (एमएच 08-एच 2832) धडक दिली. या अपघातात दिनेश दामू खेडेकर (वय 26, रा. नाणेगाव, ता. पेण) आणि रघुनाथ रामा म्हात्रे (रा. बोरी, ता. पेण) असे दोघे मृत्युमुखी पडले. त्याचप्रमाणे निकिता मारुती पवार (वय 10), धर्मा पवार (4), छबी लक्ष्मण पवार (40), खंडू दगडू जगताप (73), रोशनी राम पवार (12), अश्नोनी रमेश पवार (25), अजय प्रकाश जाधव (22), रमेश पांडुरंग शिंदे (38), जनी अंकुश पवार (23), कनिष्का भुर्या पवार (11), रत्नानी रमेश पवार (13, सर्व रा. गागोदे, ता. पेण), श्रीहरी गणपत अदनाने (55, सापोली, पेण), सोनी राजू पवार (25), राजू रामा पवार (35), अंजना गणपत वाघमारे (15), सुरज गणपत वाघमारे (13), रश्मी हरिश्चंद्र पवार (40), समिता हरिश्चंद्र पवार (16), ताई एकनाथ पवार (30), बारकू हिल्या हिलम (55), संजना संदीप पवार (30, सर्व रा. फडकेवाडी, पेण), गणपत धर्माजी चेटणो (50, पेण), शशिकांत शिवराम म्हात्रे (66, काळेश्री, पेण), हरिश्चंद्र बळीराम म्हात्रे (68, वढाव, पेण), जीवन जनार्दन पाटील (50, वाशी नाका, पेण), अनसूया भिक्या पवार (35), वृषाली रमेश वाघमारे (8, सर्व रा. खडकीवाडी), गीता गणेश पाटील (45, कळवे), पीयूष जंगम (40), छाया जंगम (30, दोघे रा. उल्हासनगर), रेश्मा गावंड (40), वेदांत संदीप गावंड (10), अथर्व संदीप गावंड (6, सर्व रा. बदलापूर), रामचंद्र जनार्दन भुर्के (71), पूजा प्रकाश कुटले (35, रा. देवन्हावे, ता. खालापूर), सुरेश यशवंत म्हात्रे (63, नेरळ, ता. कर्जत), मंगल मारुती वाघमारे (25, तांबडी, ता. पेण), रावजी पवार (54, कळंबोली), बसचालक मदन गंगाधर गुलगे (34, परभणी), वाहक अरुणा बाबू शिंदे (33, पाली) असे एकूण 42 जण जखमी झाले आहेत. जखमींना पेण, अलिबाग अशा विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पेणच्या नगराध्यक्ष प्रीतम पाटील, युवा नेते वैकुंठ पाटील, ललित पाटील यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जखमींना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी तातडीचे सहकार्य केले. दरम्यान, या अपघातप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, के. एन. कांबळे अधिक तपास करीत आहेत.