कळंबोली : प्रतिनिधी
नुकत्याच आलेल्या पुराच्या तडाख्यात महाड, खरीवली, पोलादपूरमधील शाळा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. या शाळांमधील कर्मचारी व शाळांना आवश्यक असणारी साधनसामग्री देण्याचा मनोदय रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनेने हाती घेतला. यामध्ये पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या शाळांना शैक्षणिक साहित्याची मदत सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली मराठी शाळेतील शिक्षक बांधवांनी मदतीचा हात देऊन खारीचा वाटा उचलला आहे.
संघटनेच्या वतीने पूरग्रस्त शिक्षक बांधवांना अन्नधान्य व आवश्यक वस्तूंच्या किटचे वाटप महाड येथे जाऊन संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दर्दमंड उर्दू प्राथमिक शाळा, वा. गो. गाडगीळ प्राथमिक शाळा, संस्कार धाम मराठी प्राथमिक शाळा खरवली, श्री प्रभावती रा. शेठ प्राथमिक शाळा पोलादपूर, श्रीमती गे. ब. जैन मराठी प्राथमिक शाळा लाडवली, अ. ना. कोटीभास्कर प्राथमिक शाळा बिरवाडी या पूरग्रस्त शाळेत जाऊन करण्यात आले.
या वेळी संघटनेचे अध्यक्ष संदीप कदम, उपाध्यक्ष मीनाक्षी कर्वे, उपाध्यक्ष सुधाकर जैवळ, सरचिटणीस यशवंत मोकल, सचिन सावंत, सुगिद्र म्हात्रे, रीनेश गावित, देवेंद्र केळुस्कर, संजय पाटील, दत्तात्रेय पगार, विकास मांढरे, दीपक सूर्यवंशी, पिराजी पालवे, प्रमोदिनी पाटील, अरुण जोशी, राजेश्री शेवाळे आदी उपस्थित होते.