पनवेल : सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खिडुकपाडा व रोडपालीतील शेकडो शेकाप कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कळंबोली परिसरात शेतकरी कामगार पक्षाला हादरा बसला आहे.
स्तुत्य उपक्रम : कृत्रिम अवयव प्रदान
पनवेल : सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन (पुणे) यांच्या वतीने मोफत जयपूर फूट कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यातील 70 लाभार्थींना रविवारी कृत्रिम अवयव प्रदान करण्यात आले.